Home माझं पिंपरी चिंचवड Nostalgic Songs :साठवणीतले गाणे भाग ४ : ‘चल रं वाघ्या रडू नको’ – माणूस आणि मुक्या जीवाच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

Nostalgic Songs :साठवणीतले गाणे भाग ४ : ‘चल रं वाघ्या रडू नको’ – माणूस आणि मुक्या जीवाच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

'साठवणीतले गाणे' या सदराच्या चौथ्या भागात दादा कोंडके यांच्या 'चल रं वाघ्या रडू नको' या अजरामर गीतामागील भावना, निःस्वार्थ प्रेम, मैत्री, विश्वास आणि माणूस-मुक्या जीवाच्या नात्याचे हृदयस्पर्शी विश्लेषण.

by Admin
Spread the love

साठवणीतले गाणे : भाग चौथा

चल रं वाघ्या रडू नको… माणूस आणि मुक्या जीवाच्या नात्यातील निःशब्द काव्य Nostalgic Songs रचना

रसिकजनहो… अदाब!

‘साठवणीतले गाणे’ या सदराच्या चौथ्या भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत!

सर्वप्रथम, पहिल्या तीन भागांना तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. अनेकांनी फोन केले, संदेश पाठवले, काहींनी तर स्वतःच्या आठवणीही माझ्यासोबत वाटल्या. खरं सांगायचं तर, हे सदर आता फक्त माझं राहिलेलं नाही; ते तुमचं आणि माझं असं एक सामायिक भावविश्व बनत चाललं (Nostalgic Songs) आहे.🙏🙏

संगीताला भाषा नसते, धर्म नसतो, सीमा नसते. मराठी असो, हिंदी असो किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातलं संगीत असो… ते थेट मनाशी संवाद साधतं. भक्तिगीते, भावगीते, प्रेमगीते, देशभक्तीपर गीते, गझल, विरहगीते, आनंदाची गाणी, प्रेरणादायी गाणी… गीतांचे किती म्हणून किती प्रकार (Nostalgic Songs)सांगायचे?
पण या सगळ्यांच्या पलीकडे काही गाणी अशी असतात, जी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच जणू बनून जातात. वर्षानुवर्षे ती मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे पडून राहतात आणि अचानक एखाद्या दिवशी पुन्हा कानावर पडली की आठवणींचा धबधबा वाहू (Nostalgic Songs)लागतो.

आज अशाच एका गाण्याबद्दल

“चल रं वाघ्या रडू नको…”

पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा शब्दांचा अर्थ कळत नव्हता, भाव कळत नव्हते . पण तरीही ते गाणं मनात घर करून बसलं. काही गाणी शब्दांमुळे आवडत नाहीत, ती भावनेमुळे आवडतात. हे त्यापैकीच(Nostalgic Songs) एक.

या गाण्याचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर उभं राहतं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व… स्व.दादा कोंडके!

शाहीर… अभिनेता… निर्माता… दिग्दर्शक… लेखक… आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या मनाचा अचूक ठाव घेणारा (Nostalgic Songs)कलावंत.

दादा म्हटलं की अनेकांना प्रथम आठवतो त्यांचा खट्याळ विनोद. पण त्या विनोदाच्या आड एक अतिशय संवेदनशील माणूस दडलेला होता. पडद्यावर हसवणारा हा कलाकार अनेकदा आपल्या गाण्यांतून आणि प्रसंगांतून आयुष्याचं खरं तत्त्वज्ञान सांगून(Nostalgic Songs) जायचा.

दादांची शैलीही ठरलेलीच. तेच ते कलाकार, तेच ते गायक, तेच संगीतकार… आणि ती त्यांची तीच प्रसिद्ध अर्धी चड्डी! पण त्या साच्यातूनही त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य लोकप्रिय चित्रपट आणि अजरामर गाणी(Nostalgic Songs) दिली.

या गाण्याचं संगीत राम-लक्ष्मण यांचं. आज अनेकांना त्यांची ओळख *’मैने प्यार किया’* मधील गाण्यांमुळे आहे. पण त्याआधी त्यांनी दादा कोंडकेंच्या अनेक चित्रपटांना सुरांची श्रीमंती दिली होती. त्यातील हे गीत आजही मनाला तितकंच (Nostalgic Songs)भिडतं.

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं, तेव्हा मी लहान होतो. माझं बालपण एका छोट्याशा खेड्यात गेलं. त्या काळी लग्नसमारंभ, जत्रा, यात्रा किंवा गावातला कोणताही उत्सव असला की लाऊडस्पीकरवर दादांची गाणी हमखास वाजायची. भक्तिगीते आणि दादा कोंडके… एवढंच जणू आमचं संगीतविश्व (Nostalgic Songs)होतं.

त्या वेळी शब्द समजत नव्हते; पण चाल मनात उतरली. मोठा झालो… आयुष्याचे चढ-उतार पाहिले… माणसं बदलताना पाहिली… नाती तुटताना पाहिली… तेव्हा या गाण्याचा खरा अर्थ समजू (Nostalgic Songs)लागला.

हे गाणं एका कुत्र्यावर चित्रित झालं आहे, एवढंच म्हणणं म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल.

हे गाणं खरंतर एका माणसाच्या मनात साचलेल्या वेदनेचं गाणं आहे.

दादा वाघ्याशी बोलतात… पण प्रत्यक्षात ते स्वतःशीच बोलत (Nostalgic Songs)असतात.

दुनियादारीने थकलेल्या प्रत्येक माणसाची एक वेळ अशी येते, जेव्हा बोलायला खूप काही असतं; पण ऐकायला कोणीच नसतं.

अशा वेळी काहीजण डायरीशी बोलतात…

काही देवाशी…

काही स्वतःशी…

आणि काही एखाद्या मुक्या जीवाशी…

कारण तो मध्येच अडवत नाही…

उपदेश करत नाही…

फक्त शांतपणे ऐकत राहतो.

म्हणूनच वाघ्या हा या गाण्यातला फक्त कुत्रा राहत नाही…

तो विश्वास बनतो…

मैत्री बनतो…

आधार बनतो…

आणि निःस्वार्थ प्रेमाचं जिवंत प्रतीक बनतो.

आपल्या ग्रामीण संस्कृतीत तर घरातल्या कुत्र्याला कधी “मोत्या”, कधी “राजा”, तर कधी “वाघ्या” म्हणून हाक मारली जायची. तो फक्त जनावर नसायचा; तो घरचाच सदस्य असायचा. घर राखणारा, शेतात सोबत करणारा, दुःखातही शेपटी हलवत जवळ (Nostalgic Songs)बसणारा.

माणसं बदलतात…

स्वार्थ बदलतो…

नाती बदलतात…

पण प्रेमाने दिलेला एक घास आयुष्यभर लक्षात ठेवणारा हा प्राणी कधी बदलत नाही.

म्हणूनच कुत्र्याच्या आणि घोड्याच्या इमानदारीची उदाहरणं दिली जातात.

आज सोशल मीडियावर हजारो मित्र असतात.

मोबाईलमध्ये शेकडो नंबर असतात.

पण मन मोकळं करायला एक जिवाभावाचं माणूस मिळेलच, याची खात्री नसते.

अशा काळात “चल रं वाघ्या रडू नको” हे गाणं अधिकच अस्वस्थ करून जातं.

कारण ते आपल्यालाच प्रश्न(Nostalgic Songs) विचारतं…

आपल्या आयुष्यात असा एक तरी “वाघ्या” आहे का…?

ज्याच्यासमोर आपण मुखवटा न घालता जगू शकतो…

ज्याच्यासमोर आपले अश्रू लपवावे लागत नाहीत…

आणखी एक गोष्ट मला या गाण्यात नेहमी जाणवते…

आपल्या समाजात पुरुष रडत नाहीत, असं शिकवलं जातं.

पण खरंच का?

त्यालाही वेदना होतात…

त्यालाही अपयश येतं…

त्यालाही विश्वासघात सहन करावा लागतो…

फरक एवढाच… तो अनेकदा रडत नाही; मनातच साठवून ठेवतो.

दादा त्या काळात वाघ्यासमोर मन मोकळं करतात आणि नकळत हजारो पुरुषांच्या न बोलल्या गेलेल्या भावनांना आवाज देऊन (Nostalgic Songs)जातात.

हेच या गाण्याचं मोठेपण आहे.

या गाण्याचे शब्द अत्यंत साधे, सहज आणि सरळ आहेत. भाषेचा कुठलाही अवडंबर नाही, कृत्रिमपणा नाही; तरीही ते थेट हृदयाला जाऊन भिडतात.

कारण मोठेपणा शब्दांत नसतो…

तो भावनांच्या प्रामाणिकपणात असतो.

दादा कोंडके अभिनेते म्हणून कसे होते, त्यांच्या चित्रपटांवर काय टीका झाली किंवा किती यश मिळालं, हा या सदराचा विषय नाही.

माझ्यासारख्या सामान्य रसिकाने त्यांच्या कलाकृतीचं मूल्यमापन करण्याइतकी उंचीही नाही.

पण एक गोष्ट मात्र नक्की…

ग्रामीण महाराष्ट्राची नाडी त्यांनी अचूक ओळखली होती. म्हणूनच त्यांच्या कलाकृती आजही काळाच्या कसोटीवर तितक्याच ताज्या (Nostalgic Songs)वाटतात.

आजही हे गाणं ऐकलं की मन नकळत बालपणात जातं. गावची जत्रा आठवते… लाऊडस्पीकरवर घुमणारी गाणी आठवतात… आणि आठवतात ती निरागस माणसं… ज्यांच्याकडे पैसा कमी होता; पण माणुसकी भरपूर होती.

शेवटी एवढंच…

आयुष्यात अशी वेळ प्रत्येकावर येते, जेव्हा बोलायला खूप काही असतं; पण ऐकायला कोणीच नसतं.

त्या क्षणी जर एखादा “वाघ्या” आपल्या आयुष्यात असेल… मग तो मित्र असो, आई-वडील असोत, जीवनसाथी असो किंवा एखादा मुका जीव… तर आपण खरोखर श्रीमंत आहोत.

“चल रं वाघ्या रडू नको” हे फक्त एक चित्रपटगीत नाही… ते माणूस आणि मुक्या जीवामधील निःस्वार्थ प्रेम, विश्वास आणि निष्ठेची अजरामर कविता आहे.

माझ्या साठवणीतलं हे एक अनमोल गाणं…

तुम्हीही नक्की ऐका.

कदाचित…

तुमच्याही मनाच्या साठवणीतली एखादी धूसर आठवण पुन्हा जागी (Nostalgic Songs)होईल…

पुन्हा भेटू… मनाच्या साठवणीतलं आणखी एक सुरेल पान उलगडण्यासाठी.

तोपर्यंत… ऐकत राहा… आणि आठवतही राहा…!

विवेक दिगंबरराव कुलकर्णी 

 

क्रमशः ..!

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00