Home पुणे SSC Result:महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल? उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

SSC Result:महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल? उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावी (SSC) निकाल ८ मे २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता. निकाल कसा पाहायचा, अधिकृत वेबसाईट्स, DigiLocker सुविधा आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेची माहिती वाचा.

by Admin
Spread the love

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळाकडून यासंदर्भातील अधिकृत पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली (SSC Result )आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेला राज्यभरातील लाखो विद्यार्थी बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो विविध अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक असणार (SSC Result)आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे : • MSBSHSE Official Website
SSC Result Portal
DigiLocker
MKCL Result Portal

मंडळाच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका DigiLocker वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गुण पडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार (SSC Result)आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल mahresult.nic.in आणि sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

 

निकाल कसा तपासावा?

 

• mahresult.nic.in किंवा sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर जा.

• ‘SSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.

• आपला रोल नंबर (Seat No.) आणि आईचे नाव प्रविष्ट करा.

• ‘View Result’ वर क्लिक करून निकाल पाहा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

 

महत्त्वाचे मुद्दे :

 

• निकालाच्या दिवशी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जातो.

• संकेतस्थळांवरील ताण कमी करण्यासाठी अनेकदा निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय केली जाते.

• विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका नंतर शाळेमार्फत उपलब्ध करून दिल्या जातील.

दरम्यान, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही मुलींचा निकाल मुलांपेक्षा सरस राहतो का, याकडेही सर्वांचे लक्ष असणार (SSC Result) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00