Home कृषीविश्व Krushi Seva Ratna:पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने नवीनचंद्र बोऱ्हाडे यांचा गौरव

Krushi Seva Ratna:पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने नवीनचंद्र बोऱ्हाडे यांचा गौरव

महाराष्ट्र शासनाच्या 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-2023'साठी उपकृषी अधिकारी नवीनचंद्र बोऱ्हाडे यांची निवड. शून्य मशागत व नैसर्गिक शेतीतील कार्याचा गौरव.

by Admin
Spread the love

(पुणे,प्रतिनिधी दि. १९ जून ): कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार – २०२३’ पुणे विभागातील नवीनचंद्र हरिश्चंद्र बोऱ्हाडे यांना जाहीर झाला (Krushi Seva Ratna)आहे.

श्री. बोऱ्हाडे हे उपकृषी अधिकारी, वडगाव-१, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मावळ, जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. शेतकरी हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रचार करण्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले (Krushi Seva Ratna) आहे.

विशेष म्हणजे शून्य मशागत शेती आणि नैसर्गिक शेती या पर्यावरणपूरक व आरोग्यदायी शेतीपद्धतींच्या प्रसारात ते तज्ज्ञ मानले जातात. या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना कमी खर्चात, शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीचा मार्ग दाखविला(Krushi Seva Ratna) आहे.

शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क, कृषी विकासासाठीची समर्पित सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यातील विविध विभागांमधून निवड झालेल्या दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना मिळाला (Krushi Seva Ratna) आहे.

त्यांच्या या यशाबद्दल कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यामुळे पुणे विभागाच्या नावलौकिकात भर पडली असून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुण अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत (Krushi Seva Ratna) आहेत.

शेतकरी विकास, शाश्वत शेती आणि कृषी प्रगतीसाठी केलेल्या दीर्घकालीन व कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळालेली ही सन्मानाची पोचपावती असल्याची भावना कृषी क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत (Krushi Seva Ratna) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00