Home माझं पिंपरी चिंचवड Lohgadh Fort Accident:लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Lohgadh Fort Accident:लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मावळातील लोहगड किल्ल्यावर भटकंतीदरम्यान पाय घसरून ३५० फूट दरीत पडल्याने केतन विशाल आगरवाल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. लोणावळा ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू.

by Admin
Spread the love

मावळ, दि. १९ जून : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून सुमारे ३५० फूट खोल दरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत( Lohgadh Fort Accident)आहे.

 

मृत तरुणाचे नाव केतन विशाल आगरवाल (रा. लोढा सोसायटी, गहुंजे, क्रिकेट स्टेडियमसमोर) असे असून, तो मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. भटकंतीदरम्यान त्याचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती (Lohgadh Fort Accident(आहे.

 

घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लोणावळा ग्रामीण पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट(Lohgadh Fort Accident )झाले.

 

या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात किल्ले व पर्यटनस्थळांवर भटकंती करताना पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले(Lohgadh Fort Accident) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00