धर्मशाला, ता. १३ : पावसामुळे प्रभावित झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ७ विकेट्सने सहज विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमनुल्ला गुरबाज याने भारताविरुद्ध झंझावाती शतक झळकावत विक्रम नोंदवला, मात्र भारतीय संघाच्या सर्वांगीण कामगिरीसमोर त्याची खेळी निष्फळ (Team India Victory) ठरली.
सामन्यादरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना २५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला सामन्याच्या पहिल्याच षटकात धक्का बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपसिंग ब्रार (ब्रार) याने आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेत अफगाणिस्तानला बचावात्मक खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र रहमनुल्ला गुरबाजने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला (Team India Victory)चढवला.
गुरबाजने १०२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११८ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. भारताविरुद्धचे हे त्याचे शतक विशेष ठरले. मधल्या फळीत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. परिणामी अफगाणिस्तानचा डाव २५ षटकांत १९४ धावांत (Team India Victory)आटोपला.
१९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात संयमी झाली. कर्णधार शुभमन गिल याने जबाबदारी स्वीकारत शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजयाचा पाया भक्कम झाला. गिलने अफगाण गोलंदाजांचा संयमाने सामना करत आवश्यक वेळी आक्रमक फटकेबाजी(Team India Victory) केली.
दरम्यान, दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला मात्र संधीचे सोने करता आले नाही. मोठ्या अपेक्षांमध्ये मैदानात उतरलेल्या अय्यरला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले आणि तो स्वस्तात बाद झाला. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची सुरुवात निराशाजनक(Team India Victory) ठरली.
मात्र के एल राहुलने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी केल्यानंतर कालच्या पहिल्या सामन्यातही फलंदाजीत त्याने नाबाद खेळी साकारत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. भारताने २२.५ षटकांत ३ गडी गमावून १९५ धावा करत सामना जिंकला.खरं तर त्याने थोडीशी घाई केली नाहीतर गीलचे कर्णधार म्हणून पहिले शतक पूर्ण झाले असते,पण वैयक्तिक विक्रमापेक्षा संघ हित जास्त महत्वाचे असते या उक्तीनुसार राहुलने केले ते उत्तमच म्हणावे(Team India Victory) लागेल.
या विजयामध्ये भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रारची सुरुवातीची विकेट, गिलचे अर्धशतक आणि दुबेची अष्टपैलू कामगिरी ही भारताच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. दुसरीकडे गुरबाजच्या शतकामुळे अफगाणिस्तानला लढण्याची संधी मिळाली, मात्र इतर फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांचा पराभव टाळता आला (Team India Victory)नाही.
