Home प्रेरणा / यशकथा Kavyanand Pratishthan :काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन उत्साहात संपन्न

Kavyanand Pratishthan :काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन उत्साहात संपन्न

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात (Kavyanand Pratishthan)आला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व संतचित्रकार वि. ग. सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत वैद्य तसेच जळगाव येथील डॉ. श्रीकांत तारे उपस्थित होते.(Kavyanand Pratishthan)

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सुभाष चव्हाण यांनी शंखनाद करून वातावरण मंगलमय केले. अकलूज येथील कवयित्री कविता ढोबळे यांनी गणेशवंदना सादर केली. काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले, तर मुंबई येथील लेखिका व कवयित्री वंदना ताम्हाणे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.(Kavyanand Pratishthan)

यावेळी सन २०२४ चा स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार पुणे येथील कवी हरिश्चंद्र कोठावदे यांच्या ‘ऐलपैल’ या काव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला. तसेच सन २०२५ चा हा पुरस्कार सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शिक्षक-कवी राजू आठवले यांच्या ‘प्रेमांकुर’ या काव्यसंग्रहास देण्यात (Kavyanand Pratishthan)आला.

सन २०२५ चा स्व. निर्मलादेवी खंडेलवाल काव्य सन्मान रत्नागिरी येथील कवयित्री डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या ‘कश्ती’ या काव्यसंग्रहास प्रदान करण्यात (Kavyanand Pratishthan)आला.

काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित कविता स्पर्धा २०२६ च्या विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक चाळीसगाव येथील कवयित्री सारिका चव्हाण, द्वितीय पारितोषिक पुणे येथील कवयित्री हिमानी बागोरे आणि तृतीय पारितोषिक इंदूर येथील कवयित्री स्मिता सराफ यांना प्रदान करण्यात(Kavyanand Pratishthan) आले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांच्या सहभागातून साकारलेल्या ‘आमच्या कविता’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे आणि ‘कथादर्पण’ या प्रातिनिधिक कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात (Kavyanand Pratishthan)आले.

मान्यवरांनी आपल्या अनुभवसंपन्न भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवोदित साहित्यिकांनी अधिक अभ्यास, मनन आणि चिंतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कविता अधिक दर्जेदार आणि आशयघन कशा होतील याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी मूल्यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट (Kavyanand Pratishthan)केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन रंगले. यामध्ये वाणी ताकवणे (पुणे), ऐश्वर्या डगांवकर (पुणे), संगीता करवंदे (पुणे), अरुणा होणगेकर (मुंबई), रामचंद्र किल्लेदार (ग्वाल्हेर), स्मिता सराफ (इंदूर), वंदना ताम्हाणे (मुंबई), कविता ढोबळे (अकलूज), तृप्ती मुदगल (पुणे), हिमानी बागोरे (पुणे), डॉ. चित्रा गोस्वामी (रत्नागिरी), संजीवनी बारगळ (इंदूर), सुभाष धाराशिवकर (पुणे), राजू आठवले (सिल्लोड), विवेक पोटे (पुणे), नीलिमा फाटक (पुणे), शीतल मोहोळकर (मुंबई), हरिश्चंद्र कोठावदे (पुणे), सविता कुंजीर (पुणे), वि. ग. सातपुते, डॉ. श्रीकांत तारे, सूर्यकांत वैद्य, डॉ. सदानंद मोरे आणि सुनिल खंडेलवाल यांनी आपल्या काव्यरचनांनी रसिकांची मने (Kavyanand Pratishthan)जिंकली.

कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष चव्हाण, विवेक पोटे, प्रमोद कबनुरकर, अमोल शेळके आणि वंश खंडेलवाल यांचे विशेष सहकार्य (Kavyanand Pratishthan)लाभले.

 

एकूणच, साहित्य, काव्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थित साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.(Kavyanand Pratishthan)


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00