Home माझं पिंपरी चिंचवड Nasrapur Incident:नसरापूर घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत; महिला सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Nasrapur Incident:नसरापूर घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत; महिला सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. अभिषेक बारणे यांनी महिला सुरक्षा, पोलीस गस्त वाढवणे आणि आयुक्तांची तातडी बैठक घेण्याची मागणी केली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या अमानवीय घटनेचा निषेध करत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी शहरातील महिला सुरक्षा वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार करण्याची मागणी (Nasrapur Incident) केली.

 

सभेला संबोधित करताना अभिषेक बारणे यांनी नसरापूर येथील घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “ही घटना केवळ हृदयद्रावक नसून समाजाच्या संवेदनशीलतेवर झालेला गंभीर आघात आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबांवर अनेकदा सामाजिक व मानसिक दबाव असतो. त्यामुळे पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून फिर्यादीची भूमिका पार पाडून गुन्ह्याचा तपास अधिक सक्षम करावा, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल,” असे ते (Nasrapur Incident)म्हणाले.

 

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित नागरिक वास्तव्यास येत असल्याने सर्व भाडेकरूंची अधिकृत नोंदणी सक्तीची करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त (Nasrapur Incident) केली.

 

याशिवाय, नसरापूर प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या कायदा विभागाने संकलित करून सर्व नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. “प्रभागातील नागरिक त्यांच्या लोकप्रतिनिधींना या संदर्भात प्रश्न विचारत असतात. त्यामुळे नगरसेवकांकडे अचूक माहिती असणे आवश्यक आहे,” असे बारणे यांनी नमूद (Nasrapur Incident) केले.

 

सभेत शहरातील महिला सुरक्षा, पोलीस गस्त वाढवणे आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी महापालिका व पोलीस प्रशासनामध्ये अधिक समन्वय असावा, यावर भर देण्यात आला. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्षात ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी नगरसेवकांनी(Nasrapur Incident) केली.

 

सभेच्या शेवटी, नसरापूर घटनेशी संबंधित प्रशासनाच्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील सभेपूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या चर्चेत अनेक नगरसेवकांनी सहभाग घेत महिला सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी लावून(Nasrapur Incident) धरली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00