Home माझं पिंपरी चिंचवड Shree Morya Puraskar:श्री मोरया पुरस्कार २०२५; पिंपरी-चिंचवडमधील १४ गणेश मंडळांचा गौरव

Shree Morya Puraskar:श्री मोरया पुरस्कार २०२५; पिंपरी-चिंचवडमधील १४ गणेश मंडळांचा गौरव

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे ‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’चे वितरण. १४ गणेश मंडळांचा गौरव; अमली पदार्थविरोधी जनजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सवाच्या काळात शांतता, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन आणि जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमांतर्गत यंदाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४ सार्वजनिक गणेश मंडळांचा यावेळी गौरव करण्यात (Shree Morya Puraskar)आला.

 

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडणे, नियमांचे पालन करणे तसेच सामाजिक प्रबोधन व जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश (Shree Morya Puraskar)आहे.

 

आकुर्डी येथील म. दि. माडगूळकर सभागृहात २ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित(Shree Morya Puraskar) होते.

 

पोलिस आयुक्तालय स्तरावरील पुरस्कार

 

पोलिस आयुक्तालय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार चाकण येथील मयूर मित्र मंडळाला मिळाला. द्वितीय क्रमांक सुवर्ण मित्र मंडळ, क्रीडा व कला मंच, पिंपरीगाव, तर तृतीय क्रमांक बावधन येथील सिद्धीचा गणपती महिला मंडळाला देण्यात(Shree Morya Puraskar) आला.

 

प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मयूर मित्र मंडळाला ‘श्री मोरया फिरता करंडक’ही प्रदान करण्यात (Shree Morya Puraskar)आला.

 

परिमंडळनिहाय विजेते

 

परिमंडळ-१ मध्ये एस.के.एफ. गणेश उत्सव मंडळ, चिंचवड प्रथम, भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव, सांगवी द्वितीय आणि स्वराज्य मित्र मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी तृतीय (Shree Morya Puraskar)ठरले.

 

परिमंडळ-२ मध्ये सम्राट मित्र मंडळ, थेरगाव प्रथम, शिवतेज मित्र मंडळ, उर्से-शिरगाव द्वितीय आणि गणेश तरुण मित्र मंडळ, तळेगाव दाभाडे तृतीय (Shree Morya Puraskar)ठरले.

 

परिमंडळ-३ मध्ये नवयुग मित्र मंडळ, चाकण प्रथम, जय गणेश प्रतिष्ठान, आळंदी द्वितीय आणि जय बजरंग मित्र मंडळ, जाधववाडी, चिखली तृतीय(Shree Morya Puraskar) ठरले.

 

याशिवाय थेरगाव-वाकड येथील विशाल मित्र मंडळाला ‘आदर्श देखावा पुरस्कार’, तर रावेत येथील श्री शिवछत्रपती मित्र मंडळाला ‘आदर्श मिरवणूक पुरस्कार’ देण्यात (Shree Morya Puraskar)आला.

 

अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे आवाहन

 

पुरस्कार सोहळ्यात पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीवर विशेष भर दिला. सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुण व विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी (Shree Morya Puraskar)केले.

 

यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावटीचा वापर, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात (Shree Morya Puraskar)आले.

 

गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महापालिकेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि पोलिसांकडून आवश्यक परवानग्यांबाबत माहिती देण्यात(Shree Morya Puraskar) आली.

 

‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमामुळे गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधन, जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जोड मिळत असून, पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यास मदत होत (Shree Morya Puraskar)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00