पिंपरी : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारत, भीमसृष्टी, एच. ए. कॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यांना महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात (Dr Babasaheb Ambedkar Jayanti)आले.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा भारतीय संविधानाचा पाया आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा त्यांचा संदेश आजच्या पिढीने आचरणात आणण्याची गरज (Dr Babasaheb Ambedkar Jayanti)आहे.
या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, संजय काटे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य तसेच अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) होते.
दरम्यान, एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने भीमसृष्टी परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे भव्य पुष्पवृष्टी करून अनोखी मानवंदना देण्यात आली. या आकर्षक उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले(Dr Babasaheb Ambedkar Jayanti) होते.
महापालिकेच्या वतीने ११ ते १७ एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात (Dr Babasaheb Ambedkar Jayanti)आले.



