पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १६ मध्ये वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त दवाखाना उभारण्याची मागणी नगरसेविका रेश्मा कातळे आणि नगरसेवक निलेश तरस यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली (Ward16 Hospital Demand)आहे.
प्रभाग १६ हा शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असून, आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यात विलंब होत असल्याची समस्या अधोरेखित करण्यात आली (Ward16 Hospital Demand)आहे.
सध्या नागरिकांना प्रभाकर कुटे रुग्णालय आणि तालेरा रुग्णालय येथे जावे लागत असले तरी, अंतरामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर पोहोचणे कठीण ठरत(Ward16 Hospital Demand )आहे.

मागणीत २४x७ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी, ट्रॉमा केअर सुविधा, गर्भवती महिलांसाठी विशेष सेवा तसेच आधुनिक यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग प्रमुख लक्ष्मण गोफणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात(Ward16 Hospital Demand )आली.
“प्रभागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे,” असे मत कातळे आणि तरस यांनी व्यक्त (Ward16 Hospital Demand)केले.
दरम्यान, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या मागणीबाबत सकारात्मक संकेत दिले असून, लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत (Ward16 Hospital Demand)आहे.
