पुणे : लोहगड किल्ल्यावरून पडून पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा झालेला मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा मृत्यू पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणात केतनची होणारी पत्नी आणि चेतन बाबुलाल चौधरी या तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. विवाहाची तयारी सुरू असताना घडलेल्या या घटनेने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर विवाह ठरविताना परस्पर विश्वास, पार्श्वभूमीची पडताळणी आणि नातेसंबंधातील प्रामाणिकपणा याविषयीही गंभीर चर्चा सुरू झाली (Ketan Agrawal Case) आहे.
तपासानुसार, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह काही दिवसांत होणार होता. दरम्यान, सिया हिचे चेतन बाबूलाल चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतन हा या नात्यात अडथळा ठरत असल्याने त्याला हटविण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर केतनचा मृत्यू झाला आणि सुरुवातीला हा अपघात असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासातून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेने (Ketan Agrawal Case)वळवला.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाचा मृतदेह घरी आणल्यानंतर उपस्थित असलेल्या सिया गोयलच्या चेहऱ्यावर कोणतीही दुःखाची भावना दिसली नाही. तिचे वर्तन आणि प्रतिक्रिया संशयास्पद वाटल्याने त्यांचा संशय अधिक बळावला. त्यांनी असा दावाही केला की, सिया आणि चेतन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते आणि याबाबत कुटुंबाला कोणतीही कल्पना (Ketan Agrawal Case) नव्हती.
या घटनेनंतर समाजात विवाह ठरविण्याच्या प्रक्रियेबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे. केवळ आर्थिक स्थिती, शिक्षण, व्यवसाय किंवा बाह्य प्रतिमा यावर भर न देता मुलगा-मुलगी दोघांची मानसिकता, परस्पर संमती, पूर्वीचे संबंध, विवाहाबाबतची स्पष्ट भूमिका आणि कुटुंबीयांशी असलेला संवाद यांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे अनेकांचे मत आहे. विवाह हा आयुष्यभराचा निर्णय असल्याने पालकांनीही सर्व बाजूंची पडताळणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत (Ketan Agrawal Case) आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण संशयित मुलगी श्रीमंत कुटुंबातील असल्याने तिला कठोर शिक्षा होईल का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. तर काहींनी तपासावर विश्वास व्यक्त करत न्यायालयीन प्रक्रियेची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांवर अनेक दावे आणि प्रतिदावे केले जात असले तरी त्यातील सर्व माहिती अधिकृत किंवा सत्यापित असेलच असे (Ketan Agrawal Case) नाही.
दरम्यान, या प्रकरणात एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी अटक केली किंवा आरोपपत्र दाखल केले म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरतेच असे नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार अंतिम दोषनिर्धारणाचा अधिकार न्यायालयाचा आहे. न्यायालयात सादर होणारे पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैज्ञानिक व तांत्रिक तपास आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यानंतरच दोष सिद्ध होतो किंवा आरोपी निर्दोष ठरतो. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील चर्चांच्या आधारे कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरविणे योग्य ठरणार(Ketan Agrawal Case) नाही.
केतन अग्रवाल प्रकरणाने प्रेमसंबंध, विवाह, विश्वास, कुटुंबीयांची जबाबदारी आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीमध्ये नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले (Ketan Agrawal Case) आहे.
