(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी दि. २४ जून ): समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक संदर्भात परिचय करून देणाऱ्या आगामी ‘समर्थ’ या चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मनोपासना, बलोपासना आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण (Samarth Marathi Movie) केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीवर आधारित मनोपासना आणि बलोपासनेची प्रात्यक्षिके सादर केली. सामूहिक सूर्यनमस्कार आणि मनाचे श्लोकमधील १३ श्लोकांचे एकसुरात पठण करून समर्थांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात (Samarth Marathi Movie)आले.
कार्यक्रमाला सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख बाळासाहेब स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच चंद्रतनय दादा, डॉ. राजीव नगरकर, रामकथाकार व चित्रपटाचे कथा-संकल्पनाकार रवींद्र पाठक, दिग्दर्शक योगेश फुलफगर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर व कार्यकारी निर्माता अमोल भगत, कलाकार पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस, हार्दिक जोशी, यतीन कार्येकर, ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित (Samarth Marathi Movie)होते.
कथा आणि संकल्पनाकार रवींद्र पाठक म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून आजच्या काळासाठीही तेवढेच प्रेरणादायी आहेत. शिस्त, सामर्थ्य, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘समर्थ’ चित्रपटातून केला आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेले हे पोस्टर अनावरण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी (Samarth Marathi Movie)आहे.”
दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी सांगितले की, “‘समर्थ’ हा चरित्रपट नसून समर्थ रामदासांच्या विचारांवर आधारित मनोरंजनप्रधान व्यावसायिक चित्रपट आहे. त्यांच्या विचारांचा आजच्या युवकांच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात आले (Samarth Marathi Movie) आहे.”
थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक संदर्भात घेतलेला हा प्रवास प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार (Samarth Marathi Movie) आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र पाठक यांनी केले, तर सूत्रसंचालन विनया देसाई यांनी (Samarth Marathi Movie)केले.
