प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढत असून आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रफुल्ल अरीकस्वामी (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणातील बळींची संख्या आता १७ वर पोहोचली (Poisonous Liquor Case) आहे.
प्रफुल्ल यांना उलट्या, जुलाब आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर खडकी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू(Poisonous Liquor Case) होते.
वायसीएम रुग्णालयातील जनरल मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाची प्रकृती दाखल होतानाच अत्यंत गंभीर होती. विषारी द्रव्यामुळे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांवर गंभीर परिणाम झाला होता. उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी(Poisonous Liquor Case) ठरली.
प्रफुल्ल अरीकस्वामी हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा एकमेव आधार हरपला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात(Poisonous Liquor Case) आहे.
दरम्यान, फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा १७ वर पोहोचल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली(Poisonous Liquor Case) आहे.
