Home गुन्हे Illegal Gas Refilling:चाकणमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, ८१ सिलेंडर जप्त

Illegal Gas Refilling:चाकणमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, ८१ सिलेंडर जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकणमधील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा टाकून ८१ गॅस सिलेंडर जप्त केले. आरोपीविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहिमेचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८१ गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आले (Illegal Gas Refilling)आहेत.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध धंद्यांबाबत गोपनीय माहिती संकलित करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाला चाकण-महाळुंगे रस्त्यावरील एका दुकानात अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती (Illegal Gas Refilling)मिळाली.

या माहितीच्या आधारे २ जून २०२६ रोजी पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथील हनुमान मंदिरासमोरील ‘जय गणेश भारत गॅस’ या दुकानावर पाळत ठेवली. माहितीची खात्री झाल्यानंतर स.पो.नि. पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि त्यांच्या पथकाने अचानक छापा (Illegal Gas Refilling)टाकला.

कारवाईदरम्यान आरोपी सचिन प्रकाश म्हस्के (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला एका विधी संघर्षग्रस्त बालकासह घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरताना रंगेहात पकडण्यात आले. कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसताना ज्वलनशील गॅसची हाताळणी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला (Illegal Gas Refilling) होता.

पोलिसांनी छाप्यात ८१ गॅस सिलेंडर जप्त केले असून त्यांची एकूण किंमत १ लाख ३०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८५ व २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू (Illegal Gas Refilling)आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशांक महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई (Illegal Gas Refilling)केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00