Home मनोरंजन Savarkar Mandal Nigdi:निगडीत १ मेपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला’; तीन दिवसीय कार्यक्रम

Savarkar Mandal Nigdi:निगडीत १ मेपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला’; तीन दिवसीय कार्यक्रम

निगडी प्राधिकरण येथे १ ते ३ मे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची ४२वी ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला’. दररोज सायंकाळी ७ वाजता विनामूल्य व्याख्याने

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :निगडी प्राधिकरण परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने १ मे २०२६ पासून तीन दिवसीय ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानांना सुरुवात होणार (Savarkar Mandal Nigdi) आहे.

 

शुक्रवार, १ मे रोजी माजी खासदार प्रदीप रावत ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर पहिले व्याख्यान देतील. शनिवार, २ मे रोजी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर दुसरे व्याख्यान सादर करतील. तर रविवार, ३ मे रोजी प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे ‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम व्याख्यान होणार (Savarkar Mandal Nigdi)आहे .

 

यंदा या व्याख्यानमालेचे ४२वे वर्ष असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. नागरिकांनी वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले (Savarkar Mandal Nigdi) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00