Home क्रीडा World Cup Final :वर्ल्ड कप जिंकण्यासाठी किवी संघासमोर 256धावांचे विशाल लक्ष्य

World Cup Final :वर्ल्ड कप जिंकण्यासाठी किवी संघासमोर 256धावांचे विशाल लक्ष्य

टी-20 वर्ल्ड कप 2026 अंतिम सामन्यात भारताची तुफानी फलंदाजी; न्यूझीलंडसमोर 256 धावांचे विशाल लक्ष्य. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारत मजबूत स्थितीत.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सुरू असलेल्या ICC Men’s T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत न्यूझीलंड संघासमोर 256 धावांचे प्रचंड लक्ष्य उभे केले आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकण्यासाठी किवी संघाला आता विक्रमी पाठलाग करावा लागणार (World Cup Final )आहे.

 

अभिषेकची तुफानी सुरुवात

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र भारतीय सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत किवी गोलंदाजांवर हल्लाबोल (World Cup Final ) केला.

 

अभिषेक शर्मा याने सर्व टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर देत तुफानी खेळी केली. अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने या विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. भारतीय संघाची पहिली अर्धशतकी भागीदारी केवळ 4 षटकांत पूर्ण झाली, तर पॉवरप्लेमध्ये भारताने 6 षटकांत नाबाद 92 धावा कुटत दमदार सुरुवात (World Cup Final )केली.

 

अभिषेक आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 48 चेंडूत 97 धावांची शानदार भागीदारी उभारली. मात्र 52 धावांवर असताना रचिन रवींद्र च्या चेंडूवर अभिषेक यष्टीमागे झेलबाद (World Cup Final )झाला.

 

संजूचा विक्रमी खेळ

 

दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ साधत जबरदस्त खेळी केली. त्याने या स्पर्धेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत सलग अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहली यांनी केली (World Cup Final )होती.

 

याचबरोबर या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार (24) ठोकण्याचा विक्रमही आता संजूच्या नावावर जमा झाला (World Cup Final )आहे.

 

इशानचा धडाका

 

ईशान किशन मैदानात आल्यानंतर भारतीय फलंदाजीचा वेग आणखी वाढला. त्याने केवळ 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय संघाने अवघ्या 12 षटकांत 150 धावा, तर 15 व्या षटकात 200 धावा पूर्ण केल्या.

दरम्यान, संजू सॅमसननेही दमदार खेळ करत अंतिम सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला, जो यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर होता. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो 89 धावांवर जेम्स नीशाम च्या गोलंदाजीवर झेलबाद (World Cup Final ) झाला.

 

किवी गोलंदाजांचा प्रतिकार

 

निशामने एका षटकात तीन विकेट्स घेत भारतीय डावाला काहीसा आळा घातला. त्यामुळे भारत 270 धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे वाटत असतानाच किवी गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले.अखेर भारतीय संघाने आपल्या 20 षटकांत 255 धावांचा भक्कम डोंगर (World Cup Final ) उभारला.

 

आता गोलंदाजांची कसोटी

 

या मैदानावर टी-20 मध्ये यापूर्वीचा यशस्वी पाठलाग 159 धावांचा असल्यामुळे भारताने उभारलेले लक्ष्य खूपच मोठे मानले जात आहे. भारतीय फलंदाजांनी आपली जबाबदारी उत्तम पार पाडली असून आता सामना जिंकण्याची धुरा जसप्रीत बुमराह आणि भारतीय गोलंदाजांवर असणार (World Cup Final ) आहे.

 

आता पाहायचे इतकेच—किवी संघ हा प्रचंड डोंगर सर करतो की भारत पुन्हा एकदा विश्वविजेता ठरतो!


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00