Home प्रेरणा / यशकथा Social Inequality in India:समाजात वाढत चाललेली विषमतेची दरी चिंताजनक

Social Inequality in India:समाजात वाढत चाललेली विषमतेची दरी चिंताजनक

ॲड. प्रार्थना सदावर्ते यांचे प्रतिपादन; समानतेसाठी झटणाऱ्या चळवळींना बळ देण्याचे आवाहन

by Admin
Spread the love

पुणे :“सध्या समाजाच्या सर्वच पातळ्यांवर विषमतेची दरी रुंदावत चालली असून, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. समानतेचे मूल्य सांगणाऱ्या संविधानासमोर उभी राहिलेली विषमता हे मोठे आव्हान आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी केले. समानता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या चळवळींना बळ दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी (Social Inequality in India)केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात ‘क्रांतीसूर्य सावित्रीज्योती’ या पुस्तकाचे प्रकाशन, संविधान गीताचे देशार्पण, वंदे संविधान कविसंमेलन तसेच संविधान गीतकार प्रा. शंकर आथरे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. नवी पेठ येथील पत्रकार भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न (Social Inequality in India) झाला.

यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, काषाय प्रकाशनाचे प्रा. चंद्रकांत वानखेडे, बंधुता प्रतिष्ठानच्या संचालिका मंदाकिनी रोकडे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, तसेच संयोजन समितीतील सुलभा मुंगी, सीमा गांधी, प्रा. सायली गोसावी, निमंत्रक डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव, प्रा. प्रशांत रोकडे आदी मान्यवर उपस्थित (Social Inequality in India)होते.

ॲड. सदावर्ते यांनी संविधान गीताची रचना आणि गीतकार प्रा. शंकर आथरे यांचे विशेष कौतुक केले. “संविधान गीत हा देशाचा अभिमानाचा ठेवा असून, त्यामध्ये संविधानाचे सार प्रभावीपणे मांडले आहे. या गीताचा व्यापक प्रसार व्हावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी संविधानासमोर उभी असलेली आव्हाने विसरता कामा नयेत, असे सांगत त्यांनी धर्मनिरपेक्षता, समानता आणि बंधुता या मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची चिंता व्यक्त केली. न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा कमकुवत होत असून, राजकीय अस्थिरतेमुळे समाजातील विषमता दिवसेंदिवस वाढत आहे. ही विषमता कमी करण्यासाठी संविधानात नव्या तरतुदी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद (Social Inequality in India)केले.

डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले की, सध्या बंधुतेचे तत्त्व पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजघटकांमध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचा अजेंडा दिसत असून, हेट स्पीचचे प्रमाण वाढले आहे. त्याविरोधात बंधुतेची मशाल पेटवणाऱ्यांना बळ दिले पाहिजे. मुस्लिम समाज संविधानवादी व्हावा, यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यरत असून, धर्मनिरपेक्ष व एकात्म समाजनिर्मिती हेच आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट(Social Inequality in India) केले.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी समता आणि बंधुतेच्या माध्यमातून भारत देश हा विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र व्हावा, असा आशावाद व्यक्त केला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संविधान, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता तसेच शेतकरी-श्रमिकांच्या प्रश्नांबाबत उदासीनता असल्याची टीका त्यांनी केली. मात्र, त्याविरोधात सातत्याने संघर्ष करत राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी(Social Inequality in India) सांगितले.

संविधान गीताचे रचनाकार प्रा. शंकर आथरे यांनी संविधान गीताचे सादरीकरण केले. या गीताची संकल्पना बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वंदे संविधान काव्यसंमेलन सादर करण्यात(Social Inequality in India) आले.

स्वागताध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आजचे सामाजिक चित्र विदारक असल्याचे नमूद करत, सामाजिक न्याय, बंधुता आणि समानतेची चळवळ घराघरात पोहोचवणे हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे(Social Inequality in India) सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता झिंजुरके यांनी केले. कार्यक्रमाला आचार्य आनंदऋषीजी इंग्लिश मिडियम स्कूल, कासारवाडी येथील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती(Social Inequality in India) होती.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00