पिंपरी, दि. ०५ मे २०२६ : कवयित्री रेणुका हजारे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ‘स्पर्शाविना तुझ्या’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नवदाम्पत्य चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. रूपाली यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. बर्ड व्हॅली येथील रॉयल बँक्वेट हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला साहित्य, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित (Sparshavina Tuzya)होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना राज अहेरराव यांनी वैवाहिक नात्याविषयी विचार मांडले. ते म्हणाले, “पती-पत्नी यांनी केवळ संसारातील जोडीदार म्हणून न राहता एकमेकांचे मित्र, सखा आणि सहप्रवासी म्हणून जगले पाहिजे. एकमेकांमध्ये ईश्वरत्व शोधत अद्वैतभाव जोपासला, तर वैवाहिक जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध (Sparshavina Tuzya)होते.”
कार्यक्रमात गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, टाटा मोटर्सचे कामगार नेते महेंद्र कदम, टाटा मोटर्स कलासागर साहित्य विभागाचे माजी सचिव सुधीर सहबनीस तसेच माजी उपमहापौर केशव घोळवे यांनीही मनोगत व्यक्त(Sparshavina Tuzya) केले.
या कार्यक्रमाचे नियोजन राजेश हजारे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश हजारे यांनी (Sparshavina Tuzya)मानले.
