Home प्रेरणा / यशकथा Royal Wisdom School:चिंचवडमध्ये ‘रॉयल विझडम स्कूल’च्या दुसऱ्या नव्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

Royal Wisdom School:चिंचवडमध्ये ‘रॉयल विझडम स्कूल’च्या दुसऱ्या नव्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

by Admin
Spread the love

चिंचवड :शिक्षण क्षेत्रात दर्जा, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या गुरुक्षेत्रम फाउंडेशन अंतर्गत कार्यरत रॉयल विझडम स्कूलच्या चिंचवड येथील दुसऱ्या व आणखी एका नव्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडणार आहे. या निमित्ताने किडोज प्लॅनेट स्कूल आणि युफोरिया इंटरनॅशनल स्कूल या नव्या शैक्षणिक उपक्रमांची औपचारिक सुरुवात होणार (Royal Wisdom School) आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास माननीय श्री. विजय लांडे (माजी नगरसेवक) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून,श्री. सिद्धेश्वर दादा बारणे, श्री. दीपक बारणे व श्री. गोरक्षनाथ बारणे हे मान्यवर उपस्थित (Royal Wisdom School)राहणार आहेत.

तसेच गुरुक्षेत्रम फाउंडेशन व रॉयल विझडम स्कूलच्या अध्यक्षा सौ. गौरी पवनकुमार सोनकर आणि सौ. मंजिरी मंदार लपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक उपक्रम साकारत (Royal Wisdom School)आहे.

 

नव्या शाखेमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी. तसेच इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच टी.टी.सी., फॉनिक्स, अबॅकस, नृत्य, ट्युशन्स, डे-केअर व कराटे यांसारख्या उपक्रमांची सुविधाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली (Royal Wisdom School)आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पालकांकडून या नव्या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक इमारत, सुरक्षित वातावरण, अनुभवी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती ही या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास सर्व पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यालयीन वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी ४.०० (सोमवार ते शनिवार)

संपर्क : ७४४७२ ३८८८३ (चिंचवड) / ७४४७२ ३८८८० (डूडुळगाव)

ठिकाण : राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ, चिंचवडकिडोज प्लॅनेट स्कूल व युफोरिया इंटरनॅशनल स्कूलचा नवा शैक्षणिक उपक्रम

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00