Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Ward 16:किवळे येथे नवनिर्वाचित नगरसदस्यांचा भव्य नागरी सत्कार

PCMC Ward 16:किवळे येथे नवनिर्वाचित नगरसदस्यांचा भव्य नागरी सत्कार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक व किवळे ग्रामस्थांच्या वतीने ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश तरस आणि धर्मपाल तंतरपाळे यांचा किवळे येथील बापदेव महाराज लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर नागरिकांशी संवाद, स्नेहभोजन आणि भारत-न्यूझीलंड अंतिम क्रिकेट सामन्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक तसेच किवळे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसदस्या सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, सौ. रेश्मा बापूजी कातळे तसेच नगरसदस्य श्री. निलेश गुलाब तरस व श्री. धर्मपाल यशवंत तंतरपाळे यांचा रविवारी (दि. ८ मार्च २०२६) सायंकाळी किवळे येथील श्री बापदेव महाराज लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार करण्यात (PCMC Ward 16 ) आला.

या कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित नगरसदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांशी संवाद साधला. प्रभागातील सर्व अत्यावश्यक, लोकहितवादी तसेच प्रलंबित आणि नव्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी(PCMC Ward 16 ) दिले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारत विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम क्रिकेट सामन्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणही दाखविण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी स्नेहभोजनासोबत क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसदस्यांसोबत फोटो काढत त्यांच्याशी हितगुज (PCMC Ward 16 ) साधले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे, राजेंद्र तरस, सिंधुताई तंतरपाळे, मेघा तरस तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी किवळे गावाचे माजी सरपंच सुदाम तरस व सामाजिक कार्यकर्ते रोहिदास दांगट यांनीही आपले मनोगत व्यक्त(PCMC Ward 16 ) केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन शुभम दांगट यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब तरस यांनी(PCMC Ward 16 ) मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00