“आने से उसके आये बहार, जाने से उसके जाये बहार…
बड़ी मस्तानी है मेरी महबूबा…”
अभिनेता जितेंद्र यांचे नाव घेतल्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. मुंबईतील एका चाळीत राहणारा रवी कपूर नावाचा देखणा तरुण दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नजरेत भरला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शांताराम यांच्या परीसस्पर्शाने रवी कपूर ‘जितेंद्र’ झाला आणि रुपेरी पडद्यावर त्याने सोनेरी कारकीर्द (Jumping Jack)घडवली.
‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटातून नायक म्हणून संधी मिळाल्यानंतर जितेंद्र यांनी मागे वळून पाहिले नाही. त्या काळात दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर यांसारख्या दिग्गजांचा दबदबा असतानाही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी ध्यास (Jumping Jack) घेतला.
शम्मी कपूर यांच्या स्टाईलमधील उत्साही अभिनय, नृत्य आणि रोमँटिक अंदाज यांचा प्रभाव घेत, पण त्यात स्वतःची झलक मिसळत जितेंद्र यांनी तरुणाईला वेड लावले. ‘फर्ज’ चित्रपटातील त्यांची “ऊ हू…” ही आरोळी आणि टाईट पँटमधील त्यांची खास स्टाईल प्रेक्षकांच्या मनावर कोरली (Jumping Jack)गेली.

‘बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये…’ हे ‘फर्ज’मधील गाणे आजही प्रत्येक वाढदिवशी गुणगुणले जाते. बबिता, नंदा, तनुजा, मुमताज, शर्मिला टागोर, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा अशा त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले. मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या आवाजाने त्यांच्या भूमिकांना वेगळी उंची (Jumping Jack)मिळाली.
‘जीने की राह’सारख्या चित्रपटांतून त्यांनी कौटुंबिक कथानकांना नवी दिशा दिली. ‘जिगरी दोस्त’मधील “मेरे देश में पवन चले पुरवाई…” किंवा ‘विश्वास’मधील विरहगीत “चांदी की दीवार…” यांनी प्रेक्षकांची मने (Jumping Jack)जिंकली.
‘कारवां’मधील “चढ़ती जवानी…” आणि “गोरिया कहाँ तेरा देश रे…”, ‘धरती कहे पुकार के’मधील भावस्पर्शी गाणी, ‘हमजोली’मधील उत्साही धून—अशा असंख्य गीतांनी जितेंद्र यांची कारकीर्द समृद्ध केली. नृत्य, रोमँस आणि कुटुंबप्रधान कथानक यांचा सुंदर मेळ त्यांनी (Jumping Jack)जुळवला.
७० ते ८० च्या दशकातील तरुणाईला आपल्या जोशपूर्ण अभिनयाने भुरळ घालणाऱ्या जितेंद्र यांच्या यशस्वी कारकिर्दीचा हा केवळ एक झलक आहे. त्यांचा प्रवास इतका समृद्ध आहे की एका भागात तो पूर्ण होणे (Jumping Jack)अशक्यच.
म्हणूनच…
“मुसाफिर हूँ यारों, ना घर है ना ठिकाना…
मुझे चलते जाना है, बस चलते (Jumping Jack)जाना…”
जितेंद्र यांच्या सिनेप्रवासाचा पुढील भाग पुन्हा भेटूया… पुढच्या शुक्रवारी!
— सुरेश कंक
जेष्ठ साहित्यिक आणि सिनेरसिक पिंपरी चिंचवड
