Home पर्यटन Pandharpur Yatra:यमुनानगर–निगडीतील भाविकांची पंढरपूर यात्रा उत्साहात पूर्ण

Pandharpur Yatra:यमुनानगर–निगडीतील भाविकांची पंढरपूर यात्रा उत्साहात पूर्ण

यमुनानगर–निगडीतील विठ्ठल भक्तांची एकदिवसीय पंढरपूर यात्रा उत्साहात पार पडली

by Admin
Spread the love

यमुनानगर, निगडी —विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, मुक्ताई गार्डन, यमुनानगर संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ आणि काकड आरतीला नियमित हजेरी लावणाऱ्या भाविकांसाठी एक दिवसीय पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात (Pandharpur Yatra)  आले.

 

१९ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी शंभर भाविकांचा लक्झरी बसमधून यात्रेला शुभारंभ झाला. भिगवण येथे अल्पोपहार आणि चहापानानंतर बस पुढे पंढरपूरकडे रवाना झाली. दुपारी बारा वाजता यात्रेकरू पंढरपूरला (Pandharpur Yatra) पोहोचले.

 

गोपाळपुरा आणि विष्णुपद मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण नामदेव पायरीवर एकत्र आले. सुयोग्य नियोजनामुळे सर्व भाविकांना ऑनलाइन पास सहज उपलब्ध झाले. अवघ्या तासाभरात विठ्ठल–रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेत भाविकांची मनं धन्य झाली. दर्शनानंतर सर्वांनी पुरणपोळीच्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला व आपापले मनोगत व्यक्त(Pandharpur Yatra)  केले.

 

यमुना नगरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या सहलीत विशेष आनंद लुटला. ऑनलाइन पास, आरामदायी बस, उत्तम नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था पाहता, सर्वांनी विठ्ठल–रुक्मिणी मंदिर सेवा संस्थेच्या ट्रस्टींना अभिनंदन व  (Pandharpur Yatra)  आशीर्वाद दिले.

 

बसप्रवासात हरिपाठ, सुगम संगीत, भेंड्या, कविता वाचन, नाट्यछटा, पोवाडे आणि लोकप्रिय गाण्यांवर नाचण्याचा आनंद घेतल्याने वातावरण अधिक रंगतदार झाले. यात्रेला सुखद बनविल्याबद्दल भाविकांनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अंकुश जगदाळे, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजानन ढमाले, श्री. आप्पा काळोखे, श्री. मच्छिंद्र महाकाळ, श्री. अनंत महाराज मोरे, श्री. मंगल महाराज जगताप, श्री. गणेश इंगवले, सौ. नयना पारखे, सौ. संगीता टुपके आणि शशिकला उभे यांचे विशेष (Pandharpur Yatra)  आभार मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00