Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Recruitment :पिंपरी-चिंचवड : महापालिकेत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया नाही – प्रशासनाचा खुलासा

PCMC Recruitment :पिंपरी-चिंचवड : महापालिकेत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया नाही – प्रशासनाचा खुलासा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. समाजमाध्यमांवरील बनावट जाहिराती व नियुक्तीपत्रांपासून सावध राहण्याचे आवाहन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर महापालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू असल्याचा भास निर्माण करणारी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे समोर आले ((PCMC Recruitment) आहे.

महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे व उमेदवारांच्या खोट्या याद्या प्रसारित केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, भरतीसंदर्भात कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट (PCMC Recruitment) केले.

 

नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. भरती प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती केवळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी (PCMC Recruitment)दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00