Home गुन्हे Kalewadi Phata Accident:काळेवाडी फाट्यावर अपघात | भरधाव ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

Kalewadi Phata Accident:काळेवाडी फाट्यावर अपघात | भरधाव ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी फाटा परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालकाला अटक करून भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी, ता. ३१ – भरधाव ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काळेवाडी फाटा परिसरात शुक्रवारी (ता. ३०) रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ट्रकचालकाला अटक केली  (Kalewadi Phata Accident)आहे.

या घटनेप्रकरणी नजमा शेख (वय ३२) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रकचालक लहू भगवान गोयकर हा काळेवाडीकडून कस्पटेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. याचवेळी दुचाकीवरून जाणाऱ्या १९ वर्षीय युवकाला त्याने जोरदार धडक  (Kalewadi Phata Accident) दिली.

अपघातानंतर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित  (Kalewadi Phata Accident) केले.

घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि ट्रक ताब्यात घेतला. आरोपी चालकाला अटक करून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०६ (१), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Kalewadi Phata Accident) आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, काळेवाडी फाटा परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पोलिसांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रण आणि गतीमर्यादा कडकपणे राबवण्याचे आश्वासन दिले (Kalewadi Phata Accident) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00