Home गुन्हे Sex Racket:पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा व लॉजिंगच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कडक कारवाई

Sex Racket:पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा व लॉजिंगच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कडक कारवाई

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक व धार्मिक परिसरात स्पा आणि लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाविरोधात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर पावले उचलली आहेत. सांगवी व हिंजवडी परिसरातील दोन स्पा सेंटर्स आणि एका लॉजिंगवर पुढील एक वर्षासाठी टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली (Sex Rackets)  आहे.

या कारवाईतसांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘जी.एस. स्पा’ व ‘ऑरा थाई स्पा’,तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग’या तीन आस्थापनांचा (Sex Rackets)समावेश आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापे टाकून संबंधित ठिकाणी सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या प्रकरणी गौरी निलेश शर्मा, व्यंकटेश कोदंडबानी, अभिजित लॉरेन्स, प्रवीण बळीराम असटकर, युवराज राजेंद्र पाटील आणि राहुल चव्हाण उर्फ अमित यांच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले (Sex Rackets)आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,सांगवीतील गांगर्डे नगर व पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन परिसरात असलेल्या स्पा सेंटर्समध्ये,तसेच हिंजवडीतील विनोदे वस्ती परिसरातील लॉजमध्ये,अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू होता. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार शैक्षणिक व धार्मिक स्थळांच्या जवळ सुरू असल्याने पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध (PITA) कायद्यांतर्गत कठोर(Sex Rackets) कारवाई केली.

संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या तिन्ही आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचे आदेश (Sex Rackets) दिले.

महत्त्वाचे म्हणजे, गेल्या तीन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तब्बल २६ आस्थापनांवर पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित व कायदेशीर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राबवलेल्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत  (Sex Rackets) होत आहे .


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00