प्रतिनिधी- नमस्कार फाउंडेशनतर्फे “नमस्कार महोत्सव २०२५” चे आयोजन बुधवार, ३ डिसेंबर ते रविवार, ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. आकुर्डी प्राधिकरण, महापौर निवास परिसरातील नियोजित ठिकाणी हा महोत्सव होणार असून विविध सांस्कृतिक, मनोरंजन तसेच आरोग्यविषयक उपक्रमांचे आकर्षक आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या महोत्सवासाठी अनुप मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचे (Namaskar Mahotsav-2025) सहकार्य लाभले आहे.
शुक्रवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, रमेश कस्तुरे, प्रीतम राणी शिंदे, सीमा हिमने, चंद्रशेखर जोशी, आण्णा हिंगे, मुन्ना बेग, सुनीता खुणे, सचिन सोनवणे, मनोज देशमुख आदी संयोजन (Namaskar Mahotsav-2025)समिती सदस्य उपस्थित होते.
सुहास जोशी म्हणाले की, नमस्कार फाउंडेशनची स्थापना २००३ साली झाली असून पिंपरी-चिंचवड, संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथे मधुमेह व सांधेदुखीमुक्ती अभियान संस्था राबवते. पहिला नमस्कार महोत्सव २००६ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
यंदाचा कार्यक्रम:
• बुधवार, ३ डिसेंबर – सायं. ७ वाजता ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन. रात्री ८ वाजता निगडी येथील शब्दरंग, कला, साहित्य कट्टा संस्थेचा “इंद्रधनु” कार्यक्रम.
• गुरुवार, ४ डिसेंबर – सायं. ६:३० वाजता “म्युझिकल मेलडी” सुरेल गीतांचा कार्यक्रम. रात्री ८:३० वाजता शरद जाधव यांचा “हास्ययात्रा” एकपात्री प्रयोग.
• शुक्रवार, ५ डिसेंबर – सायं. ७ वाजता महेश वामन मांजरेकर निर्मित, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिकेतले “करून गेलो गाव” नाटक.
• शनिवार, ६ डिसेंबर – रात्री ८:३० वाजता कलाकार अजितकुमार कोष्टी यांचा “हसवणूक” हा बहारदार विनोदी एकपात्री प्रयोग.
• रविवार, ७ डिसेंबर – सायं. ७ वाजता संतोष पवार लिखित-दिग्दर्शित “हीच खरी फॅमिली ची गंमत आहे” या कौटुंबिक नाटकाने महोत्सवाचा समारोप. नाटकात सागर कारंडे, संतोष पवार, शलाका पवार, हर्षदा कर्वे, प्रतीक पाद्ये, विनिषा कुळकर्णी, राकेश शालिनी यांची भूमिका आहे.
आरोग्य उपक्रम:
महोत्सवाच्या ठिकाणी पाचही दिवस दुपारी ३ ते सायं. ६ दरम्यान आयुर्वेदाचा प्रचार, डिजिटल तरंग यंत्राद्वारे नाडी तपासणी, कांस्य थाळी मसाज, ॲक्युप्रेशर, मधुमेह व रक्तदाब तपासणी, उपचार व मार्गदर्शन या सेवा उपलब्ध असतील. तसेच फन फेअर आणि रोजच्या लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे दिली जातील.
संस्थेची सामाजिक कार्ये:
सलीम शिकलगार यांनी सांगितले की, समाजाचे शारीरिक व सांस्कृतिक आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या हेतूने नमस्कार फाउंडेशन कार्यरत आहे. कोविड काळात सुरू केलेल्या मोफत “रोटी बँक” उपक्रमांतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे दररोज दुपारी १२:३० वाजता गरीब, फिरस्ते व रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. तसेच आकुर्डीतील कै. मल्हारराव कुटे रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी दुपारी ४ वाजता हर्बल टी आणि सायं. ७ वाजता मोफत जेवण दिले जाते.
नमस्कार फाउंडेशनच्या उपक्रमांना यापूर्वी पुष्कर श्रोत्री, संजय मोने, मुक्ता बर्वे, संजय नार्वेकर, भूषण कडू, अभिजीत कोसंबी, कार्तिकी गायकवाड, रवींद्र साठे, ज्ञानेश्वर मेश्राम, शरद उपाध्ये, मा. गो. वैद्य, विश्वास मेहंदळे यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.
यावर्षीचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत असून शिबिरात सहभागी होण्यासाठी 9604992033 / 9579402954 या क्रमांकांवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
