79
प्रतिनिधी _ बुधवारी मध्यरात्री तळेगाव दाभाडे परिसरात पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये रंगलेल्या चकमकीने परिसर दणाणून गेला. सोमाटणे टोल नाक्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या युनिट २ च्या पथकानं कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला तुफान पाठलाग करत टोल प्लाझाच्याच परिसरात वेढा घातला. संशयितांकडून गोळीबार होऊनही पोलिसांनी निर्धाराने कारवाई करत तिघा गुन्हेगारांना पकडण्यात यश (Somatane Shootout Arrest)मिळवले.
