प्रतिनिधी :सुपर-8 फेरीतील कालच्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात साऊथ आफ्रिका टीम ने दमदार कामगिरी करत भारतीय संघाला तब्बल 76 धावांनी पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने भारतच्या अव्वल स्थानाच्या दाव्याला मोठा धक्का (India vs South) दिला.
मिलर–ब्रेव्हीसची तुफानी भागीदारी
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला. सुरुवातीला त्यांची अवस्था डळमळीत झाली होती; मात्र मधल्या फळीत डेविड मिलर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हीस यांनी आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. दोघांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करत धावांचा वेग वाढवला. अखेरीस दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 187 धावांचा भक्कम स्कोर(India vs South) उभारला.
भारतीय फलंदाजीची निराशाजनक कामगिरी
188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. ईशान किशन शून्यावर माघारी परतला, तर तिलक वर्मा केवळ 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा यालाही मोठी खेळी करता आली नाही; तो 15 धावांवर बाद (India vs South) झाला.
मधल्या फळीत सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग Rस्वस्तात बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली. शिवम दुबे यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला इतरांकडून साथ मिळाली (India vs South) नाही.
अखेरीस भारतीय संघ निर्धारित षटकांत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा(India vs South) लागला.
पुढील वाटचाल खडतर
या पराभवामुळे सुपर-8 मधील भारताची स्थिती कठीण झाली असून पुढील सामन्यांमध्ये विजय मिळवणे अत्यावश्यक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने मात्र सर्वच विभागांत सरस कामगिरी करत स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम केली(India vs South) आहे.
