प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी कडक भूमिका घेतली आहे. नदीपात्रात औद्योगिक सांडपाणी आणि कचरा सोडणाऱ्या कंपन्यांना त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्यात (Ravi Landge) येईल.
महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत नदी परिसराची पाहणी करून स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. काही उद्योगांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात (Ravi Landge)आले.
पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत महापौरांनी नागरिक आणि उद्योगांना नदी स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासनाकडून नियमित तपासणी करून प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Ravi Landge) केले.
