Home पुणे Maharashtra Monsoon Update:महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पुण्यासह २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Monsoon Update:महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पुण्यासह २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले असून २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : राज्यात नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाले असून तळकोकणात त्याने दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह किनारपट्टी भागात जोरदार पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम (Maharashtra Monsoon Update)आहे.

 

भारतीय हवामान विभागाने राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवस काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला(Maharashtra Monsoon Update) आहे.

 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला (Maharashtra Monsoon Update)आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ९ जूनपर्यंत कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून राज्यभर मान्सूनचा विस्तार पूर्ण होण्यासाठी १५ जूनपर्यंतचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली (Maharashtra Monsoon Update)आहे.

 

शेतकऱ्यांनी पेरणीचे निर्णय घेताना स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले (Maharashtra Monsoon Update)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00