Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Metro DPR:महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण शहराच्या भविष्यातील विकासाला पूरक नियोजनावर भर

Pcmc Metro DPR:महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण शहराच्या भविष्यातील विकासाला पूरक नियोजनावर भर

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. भविष्यातील लोकसंख्या, आयटी पार्क, औद्योगिक क्षेत्र आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. 27 जुलै 2026) : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन प्रस्तावित मेट्रो मार्गांचे नियोजन केवळ आजच्या परिस्थितीपुरते मर्यादित न ठेवता पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला (Pcmc Metro DPR) दिले.

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठिया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महामेट्रो आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित(Pcmc Metro DPR) होते.

 

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराची माहिती दिली. मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात (Pcmc Metro DPR) आली.

यावेळी नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसर, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्रे आणि प्रमुख वाहतूक मार्गांना मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि शहराच्या विस्तारणाऱ्या सीमांचा विचार करून डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत उपस्थित मान्यवरांनी सूचना (Pcmc Metro DPR) मांडल्या.

मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बस सेवा, पार्किंग, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’चा प्रभावी समावेश करण्यावर भर देण्यात आला. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास, औद्योगिक व आयटी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असे बैठकीत नमूद करण्यात (Pcmc Metro DPR) आले.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आगामी काळातील लोकसंख्या वाढ, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार तसेच नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे. आजच्या गरजांसोबतच पुढील अनेक दशकांचा विचार करून उभारले जाणारे मेट्रो नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईल. त्यामुळे डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करून नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प (Pcmc Metro DPR) साकारावा.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00