पिंपरी : पवना धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सोमवारी (27 जुलै) दुपारी 3 वाजता खडकवासला पाटबंधारे विभागाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी (Flood Alert) केला.
सध्या पवना धरण 96 टक्के भरले असून नदीपात्रात 1,400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तो वाढवून 3,500 क्युसेक करण्यात येणार असून, पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 9,000 क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले (Flood Alert)आहे.
सततच्या पावसामुळे पवना नदी तसेच परिसरातील ओढे आणि नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊन सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीकाठील ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी व लाभधारकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले (Flood Alert) आहे.
नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन व जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी केले (Flood Alert) आहे.
