प्रतिनिधी :हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरी व ट्रेनिंगचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कंपनीच्या संचालकांसह आरोपींना अटक करण्यात आली (Hinjewadi Job Scam) आहे.
याबाबत पांडुरंग पदमाकर केंद्रे (वय २३, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२५ पासून विप्रो सर्कल, फेज २, हिंजवडी येथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी(Hinjewadi Job Scam) दिली.
अॅक्युअर सॉफ्टटेक प्रा. लि. कंपनीचे संचालक अमोल महाडीक, ओमकार महाडीक तसेच इतर संबंधित व्यक्तींनी फिर्यादी व इतरांना नोकरी आणि ट्रेनिंग देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. ट्रेनिंगच्या नावाखाली काम करून घेतले, मात्र कोणताही प्रोजेक्ट न देता वेळकाढूपणा केल्याचे समोर आले(Hinjewadi Job Scam) आहे.
तसेच नामांकित कंपन्यांत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत डिपॉझिट व कमिशनच्या नावाखालीही पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी व इतरांकडून एकूण ₹७.८० लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले (Hinjewadi Job Scam)आहे.
सध्या संबंधित कंपनीचे कार्यालय बंद असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करत(Hinjewadi Job Scam) आहेत.
