प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात भरगर्दीच्या रस्त्यावर १३ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून रिक्षा चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला (Wakad Viral Video) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीची मोठी गर्दी असताना अल्पवयीन मुलगा भरधाव वेगाने रिक्षा चालवत होता. विशेष म्हणजे, रिक्षेत मागे बसलेली व्यक्ती त्याला थांबवण्याऐवजी प्रोत्साहन देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. त्यामुळे स्वतःच्या तसेच इतर वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला(Wakad Viral Video) होता.
व्हिडिओ समोर आल्यानंतर वाकड वाहतूक पोलिसांनी तत्काळ पडताळणी करून संबंधित रिक्षा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. परमेश्वर शंकर सूर्यवंशी (रा. वाकड) यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला रिक्षा चालवू दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली (Wakad Viral Video) आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन बबन सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अशा बेजबाबदार कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत (Wakad Viral Video) आहे.
