3
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सीमा दत्ता फुगे यांचे शनिवारी (५ सप्टेंबर) निधन झाले. पिंपरीचे प्रसिद्ध ‘गोल्डमन’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दत्ता फुगे यांच्या त्या पत्नी (Seema Datta Fuge)होत्या.
सीमा फुगे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून २०१२ मध्ये भोसरी गावठाण प्रभागातून महापालिकेवर निवडून आल्या होत्या. मात्र, बनावट जातीचा दाखला सादर केल्याच्या प्रकरणात त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर त्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिल्या(Seema Datta Fuge) होत्या.
त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. शनिवारी मोशी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात (Seema Datta Fuge) आले.
