Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Traffic Police:‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून २,२८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ४४४ शाळांमध्ये जनजागृती

Pcmc Traffic Police:‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून २,२८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ४४४ शाळांमध्ये जनजागृती

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून ३४ टप्प्यांत ४४४ शाळांमधील १,११,४४७ विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांबाबत मार्गदर्शन.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाच्या ३४ व्या टप्प्यात १४ शाळांमधील सुमारे २ हजार २८० विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात (Pcmc Traffic Police) आले.

 

दि. ३ सप्टेंबर रोजी १४ टीममधील १० अधिकारी आणि १८ अंमलदारांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याबाबत पीपीटीच्या माध्यमातून माहिती (Pcmc Traffic Police)दिली.

 

विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक आणि चांगला माणूस बनावे, या उद्देशाने हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ टप्प्यांत ४४४ शाळांमधील तब्बल १ लाख ११ हजार ४४७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले (Pcmc Traffic Police) आहे.

 

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड व गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त चंद्रकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांनी सहभाग(Pcmc Traffic Police) घेतला.

 

या उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार (Pcmc Traffic Police) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00