(पिंपरी, दि. ९ जुलै २०२६) : मोशी येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्यात आतापर्यंत ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर आज (९ जुलै) सकाळी गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या भावेश वाणी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. अद्याप ८ जणांचा शोध सुरू असून बचावकार्य अविरतपणे सुरू (Garbage Dump Collapse) आहे.
ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. कचऱ्याचा मोठा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने अंदाजे २३ जण अडकले होते. दुर्घटनेनंतर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे पाच जण स्वतःहून सुखरूप बाहेर (Garbage Dump Collapse)पडले.
मात्र उर्वरित १८ जण इमारतीत अडकल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू (Garbage Dump Collapse) केले.
बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह या सहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या आणखी तिघांना सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात (Garbage Dump Collapse) आले.
बचावकार्यासोबतच शोधमोहीमही सुरू ठेवण्यात आली असून एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान आज सकाळी सुमारे ९ वाजता भावेश वाणी यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात (Garbage Dump Collapse) आले.
सध्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत (Garbage Dump Collapse) आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा (Garbage Dump Collapse) घेतला.
