(पिंपरी, दि. ८ जुलै २०२६) : “रामकृष्ण हरी”च्या अखंड जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे प्रमुख, दिंडीप्रमुख तसेच वीणेकरांचा सत्कार करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात (Tukaram Maharaj Palkhi)आले.
यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पालखी सोहळ्यात सहभागी प्रत्येक दिंडीला प्रथमोपचार साहित्य असलेले आरोग्य किट वितरित करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी देशी वृक्षांच्या बियाण्यांच्या पाकिटांचेही वाटप करण्यात (Tukaram Maharaj Palkhi)आले.
या स्वागत सोहळ्यास आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, विठ्ठल (नाना) काटे, राहुल कलाटे, उत्तम केंदळे, अनिल घोलप, निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, निखिल बोऱ्हाडे, प्रवीण भालेकर, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, आशा सूर्यवंशी, शिवानी नरळे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले, सचिन सानप, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, उपआयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित(Tukaram Maharaj Palkhi) होते.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जनता संपर्क, अग्निशमन आणि इतर संबंधित विभागांनी व्यापक नियोजन केले होते. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुक्कामस्थळे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सेवांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तत्काळ रस्त्यांची स्वच्छताही करण्यात(Tukaram Maharaj Palkhi) आली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. नागरिक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे दर्शन घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर करत संत परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त(Tukaram Maharaj Palkhi) केली.
