Home माझं पिंपरी चिंचवड Nigdi Teacher’s Day:निगडीत शिक्षक दिन उत्साहात; ६४ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

Nigdi Teacher’s Day:निगडीत शिक्षक दिन उत्साहात; ६४ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

निगडीतील दादा-दादी विरंगुळा केंद्रात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ६४ निवृत्त शिक्षकांचा सन्मान आणि तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

by Admin
Spread the love

(निगडी, दि. ७,सप्टेंबर प्रतिनिधी ): स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील दादा-दादी विरंगुळा केंद्रात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्राध्यापक भूषण ओझर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (Nigdi Teacher’s Day)होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती देवी आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सुभाष बोरोले यांनी स्वागतगीत सादर केले. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा(Nigdi Teacher’s Day) घेतला.

भानुदास सोनगिरे यांनी प्रमुख पाहुणे प्रा. भूषण ओझर्डे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांचा कल आणि आवड ओळखून त्यांना आपल्या आवडीचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे मत व्यक्त(Nigdi Teacher’s Day) केले.

श्रीमती विजयमाला आहेर यांनी दिलेल्या ५१ हजार रुपयांच्या देणगीतून तीन शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. नाथा मानकर, विजय पापत आणि डॉ. सौ. रजनी शेठ यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्रीराम शिंपी, श्रीनिवास ठोंबरे आणि विजया आहेर यांनी अनुक्रमे पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. पुरस्कारार्थींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त (Nigdi Teacher’s Day) केले.

आदर्श शिक्षक पुरस्काराच्या परीक्षक सौ. संध्या हगवणे यांनी परीक्षण प्रक्रियेबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या यादीचे वाचन शिक्षण व सहल समितीच्या प्रमुख कुंदा कोळपकर आणि संघाचे माजी अध्यक्ष भगवान महाजन यांनी(Nigdi Teacher’s Day) केले.

कार्यक्रमात संघाच्या वतीने ६४ निवृत्त शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कोळपकर यांनी केले, तर उपाध्यक्ष दिलीप गोसावी यांनी आभार मानले. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता(Nigdi Teacher’s Day) झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00