Home महाराष्ट्र Abhishek Barne :पिंपरी-चिंचवडच्या ‘अप्पू घरा’चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासह नव्या सुविधा उपलब्ध होणार

Abhishek Barne :पिंपरी-चिंचवडच्या ‘अप्पू घरा’चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासह नव्या सुविधा उपलब्ध होणार

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २७ : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ ‘अप्पू घर’ लवकरच नव्या रूपात पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आधुनिक राईड्स, अत्याधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून अप्पू घराचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी (Abhishek Barne) दिली.

 

याबाबत बोलताना बारणे म्हणाले, “अप्पू घर हे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. शहरातील कामगार, मध्यमवर्गीय आणि कुटुंबांना कमी खर्चात दर्जेदार मनोरंजन मिळावे, हा महापालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे आधुनिकीकरण करताना तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातच ठेवले (Abhishek Barne)जातील.”

 

त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत अप्पू घरात मोठे बदल झाले नव्हते. त्यामुळे येथील राईड्स, पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठीच्या सोयी-सुविधांचे आधुनिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या विकासकामांमुळे अप्पू घर अधिक आकर्षक आणि आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित(Abhishek Barne) होईल.

 

अप्पू घरासाठी संबंधित कंत्राटदाराशी २०३१ पर्यंतचा करार करण्यात आला असून, या प्रकल्पामध्ये वॉटर पार्कसह विविध नाविन्यपूर्ण सुविधांचा समावेश आहे. उपलब्ध निधीतून सुरू असलेली विकासकामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, कामाचा दर्जा आणि पर्यटकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे बारणे यांनी (Abhishek Barne)सांगितले.

 

अप्पू घराला नवसंजीवनी देत ते पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Abhishek Barne)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00