Home गुन्हे Justice For Ketan:केतन अग्रवाल हत्या प्रकरण : न्यायाच्या मागणीसाठी लोढा बेलमोंडो सोसायटीतील नागरिकांचा भव्य मूक कॅण्डल मार्च

Justice For Ketan:केतन अग्रवाल हत्या प्रकरण : न्यायाच्या मागणीसाठी लोढा बेलमोंडो सोसायटीतील नागरिकांचा भव्य मूक कॅण्डल मार्च

गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील रहिवाशांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा आणि निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी हजारोंच्या उपस्थितीत मूक कॅण्डल मार्च काढला.

by Admin
Spread the love

गहुंजे (पिंपरी-चिंचवड), दि. २८ : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी (२७ जून) सायंकाळी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मूक कॅण्डल मार्च काढून न्यायाची मागणी (Justice For Ketan)केली.

सोसायटीच्या गणपती मंदिरापासून सुरू झालेला हा कॅण्डल मार्च क्लबहाऊसमार्गे केतन अग्रवाल यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आला. पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो रहिवासी हातात मेणबत्त्या आणि ‘Justice for Ketan Agarwal’, ‘अन्यायाविरोधात ठाम पाऊल’, ‘न्यायासाठी अखंड लढा’ अशा आशयाचे फलक घेऊन या मूक आंदोलनात सहभागी (Justice For Ketan)झाले.

या वेळी केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल, आई राखी अग्रवाल, बहीण, आजोबा, काका तसेच कुटुंबीय उपस्थित होते. मुलाच्या आठवणींनी भावूक झालेल्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांना धीर देत न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त (Justice For Ketan) केला.

यावेळी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी समाज आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानत महत्त्वाचे आवाहन केले. १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेल्या घटनेदरम्यान ज्यांनी प्रत्यक्ष काही पाहिले असेल किंवा संबंधित माहिती अथवा पुरावे असतील, त्यांनी पुढे येऊन तपास यंत्रणेला सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद (Justice For Ketan)केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २६) यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावत केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली. पोलिसांच्या तपासानुसार, पूर्वनियोजित कट रचून केतन यांना दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप (Justice For Ketan)आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही जोर धरू लागली असून, लोढा बेलमोंडो सोसायटीतील मूक कॅण्डल मार्च हा त्याच जनभावनेचा प्रभावी आविष्कार (Justice For Ketan) ठरला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00