Home गुन्हे Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ कामगारांच्या प्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २१ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत नऊ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली (Moshi Garbage Depot)आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे नियमबाह्य साठवण, आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, तसेच संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे कचऱ्याचा ढीग कोसळून इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत नऊ निष्पाप सफाई कामगारांचा मृत्यू (Moshi Garbage Depot)झाला.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी, योगेश आल्हाट, बांधकाम परवाना व अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकारी, ठेकेदार कंपनीचे जबाबदार अधिकारी तसेच इतर संबंधितांवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यांनुसार तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली (Moshi Garbage Depot)आहे.

हे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले, आम आदमी पार्टीचे युवक अध्यक्ष विकी पासोटे, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम व सतीश काळे तसेच छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींच्या वतीने देण्यात (Moshi Garbage Depot)आले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00