Home आरोग्य Pcmc Waste Segregation:१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे; नियमभंग करणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही

Pcmc Waste Segregation:१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे; नियमभंग करणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्ट २०२६ पासून कचरा विलगीकरण सक्तीचे. चार प्रकारांत कचरा वेगळा करणे अनिवार्य; नियमभंग करणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २१ जुलै २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पासून कचरा विलगीकरणाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांत विलगीकरण न केलेला कचरा घंटागाड्यांमार्फत स्वीकारला जाणार (Pcmc Waste Segregation)नाही.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांसाठी हे नियम बंधनकारक असतील. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, रुग्णालये आणि गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. अशा आस्थापनांचा कचरा १५ ऑगस्टनंतर महापालिकेच्या घंटागाड्यांद्वारे उचलला जाणार(Pcmc Waste Segregation) नाही.

 

महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विकेंद्रित कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होऊन स्थानिक पातळीवर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार (Pcmc Waste Segregation)आहे.

 

महापौर रवि लांडगे यांनी कचरा विलगीकरण ही शहराच्या स्वच्छतेसाठी आणि भविष्यासाठी आवश्यक जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन (Pcmc Waste Segregation)केले.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला, तर उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी योग्य विलगीकरणामुळे पुनर्वापराला चालना मिळून लँडफिलवरील ताण कमी होणार असल्याचे स्पष्ट(Pcmc Waste Segregation) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00