प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली. प्रशासकीय विषयांबरोबरच या बैठकीत एका वेगळ्याच राजकीय संकल्पनेची—‘किवळे पॅटर्न’ची—चांगलीच चर्चा (Kiwle Pattern) रंगली.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला धक्का देत प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेच्या निलेश तरस, रेश्मा कातळे आणि ऐश्वर्या तरस यांनी अनपेक्षित पण दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामागील रणनीतीमुळेच निवडणुकीदरम्यान ‘किवळे पॅटर्न’ ही संकल्पना शहरभर चर्चेचा विषय ठरली (Kiwle Pattern)होती.
याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेवकांनी डोक्यावर फेटा परिधान करत त्यावर ‘किवळे पॅटर्न’चा स्टिकर लावून सभागृहात प्रवेश केला. या आगळ्यावेगळ्या उपस्थितीमुळे सभागृहातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी तसेच उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले. सभागृहात उत्सुकता, कुजबुज आणि चर्चेचे वातावरण निर्माण (Kiwle Pattern)झाले.
यावेळी युवा नेते बापू कातळे आणि राजेंद्र तरस यांचीही उपस्थिती होती. ‘किवळे पॅटर्न’ ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संकल्पना नसून, जनतेशी नाते जोडणारे एक प्रतीक बनत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत (Kiwle Pattern)आहे.
महापालिकेच्या पहिल्याच बैठकीत महिला नगरसेविकांनी दिलेला हा प्रतीकात्मक राजकीय संदेश सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, येत्या काळात ‘किवळे पॅटर्न’ शहराच्या राजकारणात नेमकी कोणती भूमिका बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले(Kiwle Pattern) आहे.



इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन (IAF) तर्फे लवळे येथील सांदिपनी होमेटेल येथे आयोजित परिषदेत पिंपरी-चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा’ प्रकल्पाला विशेष दाद मिळाली. या प्रकल्पांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंना विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी (Sakshama PCMC Iaf )केली.