Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Drug-Free Campus: ६०० शाळा-महाविद्यालयांतील १,१०० शिक्षकांचा सहभाग

PCMC Drug-Free Campus: ६०० शाळा-महाविद्यालयांतील १,१०० शिक्षकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ अभियानासाठी जनजागृती कार्यक्रम; ६०० शाळा-महाविद्यालयांतील १,१०० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सहभाग.

by Admin
Spread the love

पिंपरी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून शैक्षणिक परिसर ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ करण्याच्या उद्देशाने ताथवडे येथील श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील सुमारे ६०० शाळा व महाविद्यालयांमधील जवळपास १,१०० प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग (Drug-Free Campus)घेतला.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांनी प्रास्ताविकात अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम कुटुंब, शिक्षण, आरोग्य आणि संपूर्ण समाजावर होत असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त विद्यार्थी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अभियानामागे असल्याचे त्यांनी नमूद (Drug-Free Campus)केले.

अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती असल्यास ७७९८१००११२ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट (Drug-Free Campus)केले.

 

मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यसनमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संतोष पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी आभार (Drug-Free Campus)मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00