Home तंत्रज्ञान Nashik Phata Khed Elevated:नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती; भूसंपादनासाठी ‘मार्किंग’ सुरू

Nashik Phata Khed Elevated:नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती; भूसंपादनासाठी ‘मार्किंग’ सुरू

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी मार्गाचे ‘मार्किंग’ सुरू झाले आहे. भूसंपादन प्रक्रियेला वेग; पिंपरी-चिंचवड, चाकण आणि खेडच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि खेडच्या औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडून मार्गाचे ‘मार्किंग’ सुरू करण्यात आले असून, भूसंपादन प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रशासकीय बळ मिळाले(Nashik Phata Khed Elevated) आहे.

 

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पुणे–पिंपरी-चिंचवड–चाकण–खेड या औद्योगिक पट्ट्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा(Nashik Phata Khed Elevated) आहे .

 

गडकरींच्या मंजुरीनंतर लांडगे यांचा पाठपुरावा

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादन पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, यासाठी समन्वय साधण्यात आला. विधानसभा अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न उपस्थित(Nashik Phata Khed Elevated) केला.

 

आता मार्गाचे ‘मार्किंग’ सुरू झाल्याने आणि भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले (Nashik Phata Khed Elevated)आहे.

 

चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना

 

चाकण औद्योगिक पट्ट्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनेक उद्योग आहेत. मात्र, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत (Nashik Phata Khed Elevated)आहे.

 

एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब पल्ल्याची वाहतूक अधिक सुरळीत होऊन वेळ, इंधन आणि लॉजिस्टिक्स खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणच्या औद्योगिक विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त (Nashik Phata Khed Elevated)केला.

 

पुणे–नाशिक आर्थिक पट्ट्याला बळ

 

या मार्गामुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच पुणे–नाशिक आर्थिक पट्ट्याची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. उद्योग, लॉजिस्टिक्स पार्क, वेअरहाऊसिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासालाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा (Nashik Phata Khed Elevated)आहे.

 

“हा केवळ फ्लायओव्हर नाही, तर पिंपरी-चिंचवडपासून चाकण-खेडपर्यंतच्या औद्योगिक विकासाचा वाहतूक-कणा आहे. मार्किंग सुरू होणे आणि भूसंपादनाला गती मिळणे हे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील टप्प्यात भूसंपादन पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरूच राहील,” असे आमदार महेश लांडगे यांनी (Nashik Phata Khed Elevated)सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00