(पिंपरी, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची प्रशासकीय दिरंगाई दूर करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एमडी पॅटर्न’ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कामासाठी जबाबदार अधिकारी, नोडल यंत्रणा आणि निश्चित कालमर्यादा ठरवून पुढील आढावा बैठकीत ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ (ATR) सादर करण्याचे आदेश त्यांनी (MLA Mahesh Landge) दिले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील सात महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल, भूसंपादन, भूमी अभिलेख आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित (MLA Mahesh Landge)होते.
‘एमडी पॅटर्न’अंतर्गत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय :
• २२ ‘मिसिंग लिंक’ आणि प्रमुख रस्त्यांची कामे भूसंपादनाअभावी रखडली असून, २५ ऑक्टोबरपर्यंत संबंधित जमिनींची पाहणी करून सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे (MLA Mahesh Landge)निर्देश.
• तळवडे ते चऱ्होलीदरम्यान प्रस्तावित इंद्रायणी नदीकाठच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून कामाला गती देण्याच्या (MLA Mahesh Landge)सूचना.
• मोशी-डुडूळगाव येथील शासकीय गायरान जमिनीवर गोल्फ कोर्स आणि पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्याबाबत संयुक्त पाहणी करून आरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याचे(MLA Mahesh Landge) निर्देश.
• मोशी येथील प्रस्तावित IIM संस्थेसाठी जागा हस्तांतरणाची उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करण्याचे (MLA Mahesh Landge)निश्चित.
• पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘गुरुकुल’ संस्थेसाठी प्रस्तावित जागेचा कायदेशीर व प्रत्यक्ष ताबा देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे (MLA Mahesh Landge)आदेश.
• डुडूळगाव परिसरातील इको-टुरिझमसाठी सुधारित प्रस्ताव वन विभागाने डिसेंबरअखेर शासनाकडे सादर करण्याचे (MLA Mahesh Landge)निर्देश.
• मतदारसंघातील तलाठी सजा कार्यालयांसाठी स्वतंत्र आणि सोयीस्कर जागा निश्चित करण्याच्या सूचना. कायमस्वरूपी जागा उपलब्ध होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात(MLA Mahesh Landge) आले.
“केवळ बैठका घेऊन चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आता प्रत्यक्ष कार्यवाही आणि ठोस परिणाम दिसले पाहिजेत. प्रत्येक कामाचे वेळापत्रक ठरवले असून, पुढील बैठकीत प्रशासनाला ॲक्शन टेकन रिपोर्ट सादर करावाच लागेल. पारदर्शकता, गती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हा मुख्य उद्देश आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी (MLA Mahesh Landge)सांगितले.
‘एमडी पॅटर्न’मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणे, कालमर्यादा ठरवणे आणि त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा अहवाल घेणे, या तीन बाबींवर भर देण्यात आला(MLA Mahesh Landge) आहे.



