Home माझं पिंपरी चिंचवड PCMC 52 crore Scam:५२ कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणी चौकशीची मागणी; नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

PCMC 52 crore Scam:५२ कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणी चौकशीची मागणी; नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 52 कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील अंदाजपत्रकातील वाढ-घट वर्गीकरणाच्या नावाखाली सुमारे ५२ कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली( PCMC 52 crore Scam) आहे.

 

भापकर यांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी या उपसूचनांवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः पुणे ग्रँड चॅलेंज टूर (PGCT-2026) अंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांसाठी करण्यात आलेल्या वाढ-घट प्रस्तावांमध्ये काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला (PCMC 52 crore Scam) आहे.

निवेदनानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे, अरुणा लंगोटे, पंकज भालेकर आणि यश साने यांच्या स्वाक्षऱ्या काही उपसूचनांवर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आयुक्तांना पत्र देत अशा कोणत्याही उपसूचनेवर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला असून या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले(PCMC 52 crore Scam) आहे.

 

भापकर यांनी या पार्श्वभूमीवर उपसूचनांवरील स्वाक्षऱ्या खऱ्या की खोट्या, याची अधिकृत चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली आहे. तसेच अंदाजपत्रक मंजूर व लॉक झाल्यानंतर उपसूचना कशा स्वीकारल्या गेल्या, हेही तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद (PCMC 52 crore Scam) केले.

 

या संपूर्ण प्रकरणात संबंधित नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली (PCMC 52 crore Scam) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00