Home गुन्हे Nigdi Crime News: कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

Nigdi Crime News: कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

भक्ती-शक्ती ब्रिजखाली हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी सत्यजित उर्फ प्रवीण प्रभाकर रोकडे याला गुन्हे शाखा युनिट 01 ने अटक केली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध आर्म ॲक्ट कलम 4(25) अन्वयेही कारवाई करण्यात आली  (Nigdi Crime News) आहे.

 

दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 01 चे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोलीस हवालदार 2929 विजय शेळकंदे, पोशि 2097 खेडकर आणि पोशि 2892 चिखलकर हे पाहिजे, फरारी, तडीपार आरोपींचा तसेच शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या इसमांचा शोध घेत(Nigdi Crime News) होते.

 

त्यावेळी भक्ती-शक्ती ब्रिजखाली, निगडी येथे एक इसम हातात धारदार कोयता घेऊन उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला व संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या हातातील धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात (Nigdi Crime News) आला.

 

चौकशीत आरोपीने आपले नाव सत्यजित उर्फ प्रवीण प्रभाकर रोकडे (वय 25, रा. भीमशक्ती नगर, स्पाईन रोड, मैत्री वस्ती, चिखली, पुणे) असे सांगितले. पडताळणीत तो निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 776/2025, भारतीय न्याय संहिता कलम 311, 115(2), 352 तसेच क्रिअलॉ कलम 3, 7 मधील फरार पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न(Nigdi Crime News) झाले.

 

यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अधिनियम कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील कारवाईसाठी निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले (Nigdi Crime News) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00