Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Waste Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर; चार प्रकारे कचरा विलगीकरणाचे आवाहन

Pcmc Waste Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर; चार प्रकारे कचरा विलगीकरणाचे आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा जनजागृती उपक्रम. पथनाट्यातून ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजी योग्य कचरा विलगीकरणाचा संदेश.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): कचरा विलगीकरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे कचरा विलगीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. पथनाट्यानंतर नागरिकांना स्वच्छता शपथही देण्यात (Pcmc Waste Segregation)आली.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. पथनाट्य, जनजागृती मोहीम आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येत (Pcmc Waste Segregation)आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका यंत्रणेसोबत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे योग्य विलगीकरण केल्यास कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय (Pcmc Waste Segregation)अंगीकारावी.

उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे द्यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन(Pcmc Waste Segregation) केले.

पथनाट्यातून कचऱ्याचे योग्य विलगीकरण न केल्याने निर्माण होणाऱ्या समस्या आणि कचरा व्यवस्थापनातील नागरिकांची भूमिका प्रभावीपणे मांडण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात (Pcmc Waste Segregation)आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00